एके दिवशी आभाळात पसरलेल्या गुलाबी रंगाखाली एखाद्या किनाऱ्यावर पाण्याचा आवाज ऐकत, आयुष्याच्या स्टोरीबोर्ड वरचे एक एक सीन्स रिप्ले करत, आवडत्या गाण्याची धून गुणगुणत, एकांताचे पुस्तक तळहातावरच्या पुसट रेषांकडे बघत वेळ घालवण्याची आकांशा माझी जरी असली तरी तुझं माझं सगळ्यांचच आयुष्य जसजसं पुढे सरकेल तसतसं बहरत जाणारे ह्यावर विश्वास असुदेत. खचवणारी वेळ जरी आत्ता असली तरी उरी बाळगलेल्या कित्तेक भावना व्यक्त होण्यासाठी एखादा खांदा देवाने सगळ्यांच्या नशिबात लिहिलाय हे खरंय. एखादा दिवस असा येणार आहे जेव्हा मनाला लाभलेली शांतता हा संघर्ष सार्थ ठरवेल. अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे ह्याच हयातीच्या कागदावर सापडणारेत. तुझं तेज पाहुन तुला अपेक्षित नसलेल्या डोळ्यात सुद्धा समुद्र दाटुन येतो कि नाही ते बघ. ढगांच्या वर उडण्यासाठी मिळालेल्या पंखांमध्ये लवकरच ते बळ येणारे. कधी ह्या व्यथेचा कंटाळा आला तर फक्त थांबु नकोस इतकच.....
- Gaurav Ranveer Suryawanshi
Nikhil Mahamine Photography ©2016
https://www.facebook.com/nikhil.mahamine1
- Gaurav Ranveer Suryawanshi
Nikhil Mahamine Photography ©2016
https://www.facebook.com/nikhil.mahamine1



Comments
Post a Comment